Type Here to Get Search Results !

बुधवारपासून अंकलखोप येथील श्री म्हसोबा यात्रेला सुरुवात


अंकलखोप (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041

अंकलखोप (ता. पलूस) येथील चिंचबनातील श्री म्हसोबा देवालयाची पारंपरिक यात्रा बुधवार (दि. २५ मार्च) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी मानाचे बकरे हा पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवारी (दि. २६ मार्च) मानाचा गायकवाड गाडा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २७ मार्च) हा यात्रेचा मुख्य दिवस असून, गाव नैवद्य व गाव गाडे यांसारखे प्रमुख धार्मिक विधी पार पडणार आहेत.

शनिवारी (दि. २८ मार्च) पहाटे ४ वाजता श्रींची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही पालखी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत सकाळी १०.३० वाजता पुन्हा मंदिरात दाखल होणार आहे.

या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन, भिलवडी पोलीस ठाणे व पुजारी मंडळी यांनी आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याची माहिती देवालयाचे पुजारी प्रकाश गुरव, महेश पुजारी, संदेश पुजारी व शिरीष गुरव यांनी दिली

Post a Comment

0 Comments