भिलवडी (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी निवडीवर स्थानिक पातळीवर चर्चा रंगू लागली आहे. बाळासाहेब काका मोहिते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या काही समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत अपेक्षा असल्याने काही ठिकाणी नाराजीची भावना व्यक्त होत असली, तरी अनेक कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाने योग्य वेळी समन्वय साधून परिस्थिती सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
बाळासाहेब काका मोहिते यांनी मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क राखत संघटन मजबूत ठेवले असल्याने समर्थकांना उमेदवारीची अपेक्षा होती. दरम्यान, पक्षांतर्गत चर्चा व संवादातून मार्ग निघेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी काळात काँग्रेस नेतृत्व नाराज कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधते आणि पुढील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments