Type Here to Get Search Results !

विठ्ठलवाडीत ऊसाच्या फडाला लागलेल्या आगीत वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; परिसरात हळहळ




 विठ्ठलवाडी ता.पलूस  येथील वृद्ध शेतकरी गणपती सदाशिव भोसले (वय ८५) यांचा ऊसाच्या फडाला लागलेल्या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती भोसले हे गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी झालेल्या शेतातील पाला जाळण्यासाठी गेले होते. पाला जाळताना आग शेजारील ऊसाच्या फडात पसरली. आग विझविण्याच्या प्रयत्नात असताना आगीने अचानक भीषण रूप धारण करत त्यांना चारही बाजूंनी वेढले. आगीतून बाहेर पडता न आल्याने त्यांचे शरीर गंभीररीत्या होरपळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आमणापूर, विठ्ठलवाडी आणि पलूस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोक व्यक्त केला.

दरम्यान, घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


Post a Comment

0 Comments