भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. भिलवडी गावचे ग्रामदैवत हनुमान देवाची पूजा करून भिलवडी जिल्हा परिषद गट तसेच भिलवडी व वसगडे पंचायत समिती गणासाठी उभा राहिलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. महेश पाटील यांच्यासह भिलवडी व वसगडे गणातील भाजपचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, भिलवडी परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतीसंबंधित सुविधा आदी क्षेत्रांत भाजपने सातत्याने विकासकामांना गती दिली आहे. या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये भाजपबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकास हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी नमूद केले. याच विश्वासाच्या जोरावर भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार शुभारंभप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर, नरसगोंड पाटील, जवाहर पाटील, वसगडे गावचे माजी सरपंच श्रेणिक पाटील, उद्योजक डी. सी. पाटील, ऋषी टकले, विश्वजीत पाटील, व्यंकोजी जाधव, नारायण खटावकर, तात्या वडेर, रमेश पाटील, महावीर चौगुले, क्रांती पाटील, स्मिता वाळवेकर, विजय चोपडे, सचिन पाटील, विकास यादव, वासू जाधव, विशाल शिंदे, दिलीप धनवडे, सुमित सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकजुटीने काम करून घराघरात भाजपचा प्रचार पोहोचवण्याचा संकल्प केला. आगामी निवडणुकीत भिलवडी जिल्हा परिषद गटासह माळवाडी व वसगडे गणात भाजपला घवघवीत यश मिळेल, असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.


Post a Comment
0 Comments