भिलवडी(बंधुता वृत्तसेवा)
पंकज गाडे 9890382041
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतीक संग्राम पाटील तसेच पंचायत समिती माळवाडी गणाचे उमेदवार हजराबी बालेचांद सलामत आणि वसगडे गणाच्या उमेदवार शोभा आनंदा हजारे यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात येथील हनुमान मंदिरात करण्यात आली.
या शुभारंभ प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकनेते स्व. बाळासाहेब काका पाटील, स्व. आनंदराव मोहिते व स्व. संग्राम पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेले सामाजिक व विकासात्मक कार्य आजही प्रेरणादायी असून, त्याच विचारधारेतून काँग्रेसचे उमेदवार काम करतील, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा नाभिक समाजाचे उपाध्यक्ष आर. के. रोकडे, सुधीर साळुंखे, महेश जगताप, संताजी जाधव, विजय कांबळे, काशिनाथ गुरव, अश्विनी साळुंखे, ओंकार पाटील, बाळासाहेब मोरे, मीनाताई पाटील, विश्वनाथ माळी, अक्षय पाटील, सीमा शेटे, तुकाराम माने, बी. एन. मगदूम, सुदाम जगताप, पुनम पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
भिलवडी परिसराचा सर्वांगीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.
हात या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. जिल्हा परिषद गटात विकासकामांचा डोंगर उभा राहील, अशी अपेक्षा यावेळी मतदारांकडून व्यक्त करण्यात आली. प्रचार काळात एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी घेतला.
या कार्यक्रमास सांगली कारखान्याचे संचालक राजुदादा पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर आभार अमोल मगदूम यांनी मानले.




Post a Comment
0 Comments