पलूस (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव २०२५ अंतर्गत आज, रविवार दि. २ नोव्हेंबर, दुपारी ३ वाजता श्वानप्रेमींसाठी अत्यंत आकर्षक असा भव्य डॉग शो आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. प्रदीप (आप्पा) कदम, अध्यक्ष, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती, पलूस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या विशेष शोमध्ये विविध जातींचे श्वान त्यांच्या कौशल्याचे, शिस्तीचे आणि सौंदर्याचे प्रदर्शन करणार असून, नागरिक, शेतकरी आणि लहान मुलांसाठी हा कार्यक्रम मोठे आकर्षण ठरणार आहे.
“यशवंतराव कृषी महोत्सव हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून, निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्या नात्याचा उत्सव आहे. श्वानप्रेमींसाठी हा एक आगळावेगळा मंच ठरेल,” असे मत मा. प्रदीप (आप्पा) कदम यांनी व्यक्त केले.
कृषी आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून ग्रामीण जनजीवनात आनंद आणि नवसंजीवनी आणण्याचा हेतू असलेल्या या महोत्सवातील ‘भव्य डॉग शो’ हा आजचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments