पलूस ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
पलूस प्रतिनिधी फोटो पलूस-कराड रोडवरील राज्यस्तरीय ‘यशवंतराव कृषी प्रदर्शन 2025’ ला पंडित विष्णू दिगंबर पलूसकर ज्युनियर कॉलेज तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.कृषी प्रदर्शनाचे आयोजक प्रदीप आप्पा कदम व सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे विद्यार्थ्यांनी कौतुक केले. प्रदर्शनातील विविध स्टॉल्स व कृषी उपकरणांबरोबर विद्यार्थ्यांनी छायाचित्रे काढून या भेटीचे क्षण अविस्मरणीय बनवले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत सौ.निलोफर मुल्ला व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी
प्रदर्शनातील आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फळ प्रक्रिया उद्योग, AI आधारित शेती उपाय, ड्रोनद्वारे फवारणी आदी विभागांना भेट देऊन माहिती घेतली. या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे, मुख्याध्यापक तानाजी करांडे, तसेच विभागप्रमुख अविनाश चव्हाण यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा प्रदर्शनांमुळे आधुनिक कृषीविषयी प्रत्यक्ष अनुभव व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील नव्या संधींचे ज्ञान मिळते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी विशेषतः AI तंत्रज्ञान विभाग आणि सेंद्रिय उत्पादन स्टॉल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली तसेच त्यांच्या मनात शेतीविषयक अभिरुची अधिक दृढ झाली, असे विद्यार्थ्यांनी समाधानाने सांगितले.


Post a Comment
0 Comments