पलूस (सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे ९८९०३८२०४१
पलूसच्या राजकारणात आता परिवर्तनाची वाऱ्याची झुळूक नव्हे, तर भाजपचा भगवा वादळच उठले आहे! “ही सभा म्हणजे विजयाची घोषणा, पलूस नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल,” असा ठाम आणि आक्रमक विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केला.पलूस येथे भाजपच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा, कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर थेट प्रहार केला. “विकासाच्या नावावर केवळ घोषणा करणाऱ्यांचा काळ संपला आहे; आता काम करणाऱ्या पक्षाची वेळ आली आहे,” असा टोला चंद्रकांत दादा पाटील यांनी लगावला.
या वेळी आ. सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, नेते पृथ्वीराज देशमुख, शरद लाड, सर्जेराव (अण्णा) नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पलूस तालुक्याचे राजकीय समीकरणच बदलून टाकले.
चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने धावत आहे. महाराष्ट्राचा विकास थांबवू शकणार नाही, आणि त्यासाठी पलूस नगरपरिषदही भाजपच्या हातात असणे गरजेचे आहे. विरोधकांनी कितीही कटकारस्थान रचले तरी जनता जागी आहे, ती आता विकासावर शिक्कामोर्तब करणार आहे.”
आ. सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “भाजप म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारण. पलूसच्या विकासासाठी उद्योग व रोजगार यांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. एमआयडीसी पुन्हा सुरू करून शेकडो युवकांना रोजगार देणार.”
शरद लाड यांनी विरोधकांना थेट इशारा दिला — “पलूसची जनता आता फसणार नाही. खोट्या आश्वासनांनी राजकारण करणाऱ्यांचा पत्ताच नाहीसा होईल. पलूसमध्ये आता भगवा झेंडा फडफडणार आणि परिवर्तनाची नवी पहाट उगवणार.”
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संदीप मोरे, मिलिंद (भैय्या) पाटील, रामानंद पाटील, संजय येसूगडे, सुभाष सुतार, सागर सुतार, गणेश नलवडे, उमेश पाटील व शेकडो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments