पलूस ( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
पलूस नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ३ आणि १० मधील उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. “ढिलं पडायचं नाही… जोमाने कामाला लागा… विजय आपलाच आहे,” अशा जोशपूर्ण शब्दांत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरत प्रचाराला वेग दिला.
प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार योगिता रामानंद पाटील, सागर बाळू कांबळे तसेच प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार शाहूराज पांडुरंग पाटील, नीलम नितीन शितापे आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सोनाली सागर नलवडे यांच्या प्रचाराचा नारळ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत फोडण्यात आला. पारंपरिक रितीने झालेल्या या शुभारंभावेळी घोषणाबाजी, ढोल-ताशांचा नाद आणि कार्यकर्त्यांचा उसळलेला उत्साह वातावरणात जाणवत होता.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. उद्योजक सर्जेराव नलवडे, संजय येसुगडे, रामानंद पाटील, पैलवान रणजीत निकम, बागल साहेब, दिलीप तात्या पाटील, शशिकांत पाटील, प्रफुल्ल पाटील, वसंत पाटील, उमेश पाटील, हिम्मत शिसाळ, बंडा निकम, आनंद निकम, रोहित सदामते, सुभाष सुतार, राहुल शितापे, नारायण लोखंडे तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचवार्षिक निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला वेग दिला आहे. मतदारांपर्यंत पोहोचणे, विकासाच्या योजना मांडणे आणि स्थानिक प्रश्नांना उत्तर देणे या दिशेने भाजपचा शुभारंभ कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. या उत्साही प्रचारशुभारंभामुळे निवडणूक वातावरणाला चांगलीच गती मिळाली असून आगामी दिवसांत प्रचार आणखी जोमदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.



Post a Comment
0 Comments