Type Here to Get Search Results !

विकासाच्या बळावर नगरपरिषदेत झेंडा फडकवण्याचा विश्वास — सुहास पुदाले


पलूस (सत्यवेध न्यूज) 

पंकज गाडे 9890382041


पलूस — स्वर्गीय माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व माजी मंत्री, विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस शहरात झालेल्या मोठ्या विकासकामांच्या बळावर यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास काँग्रेस नेते सुहास पुदाले यांनी व्यक्त केला.

पलूस प्रभाग क्रमांक २ मधील मतदारांच्या गाठीभेटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, “पलूसमधील पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असून आणखी अनेक महत्त्वाकांक्षी योजना पुढील काळात राबवण्यात येणार आहेत. विरोधक कितीही खोटे आरोप करत असले तरी पलूसची जनतेला सत्य कळते; ती अफवांना बळी पडणारी नाही.”


या दौऱ्यात पुदाले यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संजीवनी सुहास पुदाले, प्रभाग २ चे उमेदवार रोहित कुमार दळवी, सौ. कोमल राहुल सदामते, तसेच विशाल दळवी, मोहनराव सुतार, संभाजी पाटील, शरद वडार, आदीक दळवी, अजिंक्य जाधव, अनिल जाधव, राहुल सदामते, नंदकुमार गायकवाड, श्रीकांत जाधव, सुशांत मोहिते, चेतन माने, विश्वजीत गोंदील, गणपत सदामते, सिमा सदामते, श्वेता सदामते, लतिका पवार, मिना सदामते, शाम सदामते आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments