Type Here to Get Search Results !

माझे स्वागत पाहून मला पुन्हा मंत्री झाल्यासारखे वाटले!” — आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा विनोदी क्षण भिलवडी स्टेशन येथे ‘हॉटेल दोस्ती’चे जल्लोषात उद्घाटन......




भिलवडी ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041


पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन  येथे सोमवार दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी ‘हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंट’चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉक्टर विश्वजीत कदम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील यांचे महिलांनी औक्षण केले तसेच आयोजकांनी सनई, हालगी, तुतारीसह पेपर ब्लास्ट व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत जंगी स्वागत केले.
 महाराष्ट्राचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांनी हॉटेलमधील व्यवस्थेची पाहणी केली. आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत विश्वनाथ माळी यांनी केले तर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित भिलवडी स्टेशनचे माजी सरपंच नंदकुमार कदम (दादा) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून, उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सागर कदम व नंदकुमार कदम (दादा) यांच्या हस्ते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.तर
आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते सागर कदम यांचा अभिनंदनीय सत्कार करण्यात आला.



भिलवडी स्टेशन परिसरातील वाढत्या लोकसंख्येची व प्रवासी नागरिकांची खाद्यपदार्थांची गरज ओळखून, ग्रामपंचायत सदस्य सागर कदम यांनी तासगाव–भिलवडी रोडवरील खंडोबाचीवाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ ‘हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंट’ची उभारणी केली. आधुनिक सजावट, प्रशस्त बसण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची हमी ही या रेस्टॉरंटची वैशिष्ट्ये असल्याचे सागर कदम यांनी सांगितले.तसेच पुढे बोलताना सागर कदम म्हणाले की, “भिलवडी व तासगाव परिसरात कुटुंबासमवेत सुरक्षित आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी योग्य असे ठिकाण कमी होते. ती कमतरता भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे.”
हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभ
 प्रसंगी बोलताना आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, “ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि पर्यटनवाढीसाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. 


शेतीवर अवलंबून न राहता सागर कदम यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा घेतलेला निर्णय धाडसी व कौतुकास्पद आहे. हॉटेल व्यवसायात सातत्य ठेवावे लागते. सातत्य,दर्जा योग्य ठेवल्यास यामध्ये आर्थिक भरभराट होऊ शकते.
स्वतच्या पायावर उभं रहायला धाडस लागतं आणि ते धाडस सागर कदम यांनी दाखवले आहे. सागर कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आयुष्य भर राहिन.हि दोस्ती तुटायची नाही... असे म्हणत... हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंट हे ग्रामीण भागातील दर्जेदार हॉटेल व्यवसायाचे उत्तम उदाहरण बनावे अशी अपेक्षा व्यक्त करीत,सागर कदम यांनी सुरू केलेल्या हॉटेल दोस्तीची फ्रॅन्चाईजी महाराष्ट्रभर व्हावी.. अशी सदिच्छा व्यक्त करून, हॉटेल दोस्तीच्या पुढील वाटचालीसाठी आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
खासदार विशाल पाटील यांनी सागर कदम यांच्या हॉटेल व्यवसायात उतरण्याच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करताना, सागर कदम यांचा हा निर्णय युवा उद्योजकांना प्रेरणा देणारा निर्णय असल्याचे सांगितले.


यावेळी पलूस तालुक्यातून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, रिल्स स्टार व खवय्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विलास यादव यांनी मानले.
‘हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंट’च्या माध्यमातून भिलवडी परिसरातील खाद्यसंस्कृतीला नवा आयाम मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे नवे मार्ग खुलतील, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.



माझे स्वागत केलेले बघून मला पुन्हा  मंत्री झाल्यासारखे वाटले!"
— आ. डॉ. विश्वजीत कदम

भिलवडी स्टेशन येथे झालेल्या ‘हॉटेल दोस्ती फॅमिली रेस्टॉरंट’च्या उद्घाटनावेळी सनई, हालगी, तुतारी आणि आतषबाजीने झालेल्या जंगी स्वागताने क्षणभर मी स्वतः मंत्री असल्याचा भास झाला.
लोकांचा उत्साह, महिलांनी केलेले औक्षण आणि सागर कदम यांच्या मनमोकळ्या आदरातिथ्याने मन जिंकले. अशा प्रेमळ स्वागतामुळे कार्यकर्त्यांशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी हसत सांगितले.

Post a Comment

0 Comments