ईश्वरपूर( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
ईश्वरपूर पूर्वाश्रमीचे उरून इस्लामपूर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे एक सांस्कृतिक ओळख असणारे शहर आहे. शहरांमध्ये विविध सामाजिक संघटना एकत्र येत नेहमीच समाजाला दिशा देणारे प्रयोग करत असतात. यावेळीहि बळीराजा महोत्सव समिती व सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने बळीराजा महोत्सव साजरा करण्यात येतो.शहरातुन कृषिप्रधान संस्कृतीचा संवर्धक असणाऱ्या महान चक्रवर्ती सम्राट बळीराजाची मिरवणुक मोठ्या उत्साहात काढण्यात आली., " ईडा पिडा टळु दे,बळीचे राज्य येऊ दे" अशा घोषणा देत शहराच्या विविध भागातून बळीराजाच्या जिवंत देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली. शेती संस्कृती आणि महिला सत्ताकतेचा वारसा असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचे अखंड दर्शन होण्यासाठी सजवलेल्या बैलगाड्या,ट्रॅक्टरमध्ये सजीव देखावे सादर मिरवणुकीचे देखावे करण्यात आली. याची सुरवात सिद्धनाथ मंदिरापासून झाली. सिद्धनाथ मंदिर पाटील गल्ली उदय चौक तानाजी चौक शिवाजी चौक महावीर चौक महात्मा गांधी चौक यल्लामा चौक यांसह संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नागरिक हि पारंपारिक आणि शेतकऱ्यांच्या वेशात देखील सामील झालेले होते.भाऊबीजेला बहीण भावाचा ओवाळतानाचा भावुक प्रसंग,ईडा पिडा टळूदे.. बळीच राज्य येऊ दे प्रसंग असे जिवंत देखाव्यातून साजर करण्यात आले. भाऊबीजेचा देखावा शिवम पाटील व कु.माही पाटील यांनी सादर केला तर प्रत्यक्ष बळीराजाच्या भूमिकेमध्ये जमीर नदाफ होते.या सजीव देखाव्याना शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी कॉ. धनाजी गुरव बी जी पाटील ॲड. क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सागर पाटील, मनोज पाटील, श्रीकृष्ण पाटील, गणेश पाटील, डॉ.यशोधन पाटील, अमोल कळसकर,महादेव पाटील, जितेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, सर्जेराव कोळी,गजानन पाटील अमरसिंह पाटील,प्रविण पाटील, दिग्विजय पाटील, अतुल पाटील, वैभव पाटील, विशाल पाटील, अजित हवालदार, प्रा. रणजीत चव्हाण, प्रा.राम घुले, शाकीर तांबोळी, उमेश कुरुळकर, शंकर महापुरे, दीपक कोठावळे प्रा शामराव पाटील, खंडेराव जाधव,.राजवर्धन पाटील सत्यजित जाधव उपस्थित होते. सिद्धनाथ प्रतिष्ठान,विद्रोही सांस्कृतिक चळवळ बळीराजा शेतकरी संघटना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड नातं रक्ताचे परिवार बिरसा आर्मी दलित महासंघ महाराष्ट्र संघर्ष समिती ग्राहक पंचायत संविधान सन्मान समिती शिवशंभु प्रतिष्ठान प्रहार शिक्षक संघटना अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर सामाजिक संघटनानी या कार्यक्रमाचे आणि मिरवणुकीचे नियोजन केले होते. शहरातील प्रमुख मार्गातून आल्यावर छ.शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुक संपली.यावेळी सर्व पुरोगामी समविचारी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

Post a Comment
0 Comments