पलूस( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
पलूसमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, समाजाच्या हक्कांसाठी सागर कांबळे लवकरच आपली राजकीय भूमिका उघड करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक समतेचा ठाम आवाज बुलंद करण्यासाठी सागर कांबळे लवकरच राजकीय रणांगणात अधिकृत पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. “समाजाच्या न्यायासाठी कोणतीही वाट सोडणार नाही,” या त्यांच्या ठाम वक्तव्यातून त्यांच्या भविष्यातील राजकीय धोरणाची झलक दिसू लागली आहे.
सागर कांबळे हे स्थानिक समाजकार्य, युवाशक्ती संघटन आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसाठी दीर्घकाळ सक्रिय आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षांची लाट निर्माण झाली आहे.ते सागर भाऊ या नावाने परिचित असून,त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात.आपला घरचा...हक्काचा माणूस म्हणून सागर भाऊंकडे पाहिले जाते.
पलूसमधील सध्याचे राजकीय वातावरण शांत असले तरी सागर कांबळे यांच्या संभाव्य प्रवेशामुळे नव्या समीकरणांची निर्मिती होणार यात शंका नाही. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, “हा आवाज फक्त समाजासाठी नाही, तर संपूर्ण प्रशासनाला जागे करणारा ठरणार आहे.”
सागर कांबळे यांनी तरुणांना राजकीय शक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा तसेच सर्वसमावेशक विकासासाठी स्थानिक पातळीवर नवीन लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
कांबळे यांच्या भविष्यातील राजकीय घोषणेसाठी जनतेत उत्सुकता असून, त्यांच्या भूमिकेने राजकारणाबरोबरच नेत्यांमध्ये खळबळ उडू शकते.तसेच “आम्ही परिवर्तनासाठी तयार आहोत,” असे मत नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
सागर कांबळे येत्या काही दिवसांत आपल्या राजकीय भूमिका, विचारधारा आणि जनतेसाठी तयार केलेला कृती आराखडा जाहीर करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सागर कांबळे यांचा आवाज हा केवळ राजकीय घोषणा नसून समाजहिताच्या लढ्याला दिशा देणारा ठरणार का? याचे उत्तर काही दिवसांत मिळणार आहे.

Post a Comment
0 Comments