भिलवडी/पलूस( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
पलूस शहरात येत्या ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन – २०२५’ या बहुप्रतिक्षित कृषी महोत्सवाच्या प्रचाराची आज उत्साही सुरुवात झाली. तहसीलदार दीप्ती रिठे मॅडम यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे भव्य ‘ऍडव्हर्टायझिंग स्काय बलून’ पलूसच्या आकाशात झेपावले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रदर्शनाच्या मुख्य स्थळी गुंडादाजी लॉन, कराड–तासगाव रोड, पलूस येथे करण्यात आले होते. या वेळी पलूस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पशुसंवर्धन विभागाचे तालुका प्रमुख डॉ. संजय पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. कदम, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार दीप्ती रिठे यांनी यावेळी आयोजकांचे कौतुक करताना म्हटले की, “या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उद्योग आणि नवउपक्रमांची दिशा मिळेल. तालुक्याच्या कृषी विकासात हा महोत्सव मोलाचा ठरेल.”
सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी प्रदर्शनादरम्यान शिस्त आणि सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “स्काय बलूनच्या माध्यमातून प्रदर्शनाची माहिती संपूर्ण परिसरात पोहोचेल आणि जनतेत उत्सुकता निर्माण होईल.”
या वेळी प्रगतशील शेतकरी रवी पाटील, प्रशांत पाटील, पलूस तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष महेश सुतार, तसेच संजय शिंदे, हैबती कदम, उल्लास पाटील, अशोक माने, अर्जुन भांडगे, विष्णुपंत कदम, विलास गायकवाड, अनिल पाटील, विजय परबत, कृष्णा ढोबळे, नीरज तिवारी, अक्रम लांडगे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, शुभम निकम, सत्यजित पिसाळ, सुयोग पाटील, सौमेद परीट, सागर मासाळ, अभिजीत सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments