Type Here to Get Search Results !

हजारवाडीजवळ भीषण अपघात : बोरगावचे दोन तरुण ठार, एक गंभीर जखमी..तासगाव-भिलवडी मार्गावर चितळे डेअरीच्या दूध टॅकरला चारचाकीची जोरदार धडक


भिलवडी ( सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041


हजारवाडी ता. पलुस येथील एचपी गॅस फॅक्टरी पासून तासगाव कडे एक किलोमिटर अंतरावर 
तासगाव-भिलवडी मार्गावरील हजारवाडी (ता. पलूस) येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात बोरगाव (ता. तासगाव) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहीती नुसार  दूध वाहतूक करणारा टँकर  (क्र. MH 10 DT 3046) आणि चारचाकी फोक्सवॅगन गाडी (क्र. MH 10 EK 8005) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा चक्काचूर झाला. या धडकेत अधिक आनंदा शिंदे (वय २८) आणि ऍड ओमकार बंडूपंत हिंगमिरे (वय २७) यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक आशुतोष विठ्ठल जाधव (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे बोरगावहून भिलवडी स्टेशन येथे जात होते. हजारवाडी येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या  दूध टॅकरला जोरदार धडक बसली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तासगाव येथील खासगी हजारवाडीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. चालक आशुतोष विठ्ठल जाधव (वय २७ )यांची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार चालू आहेत.
घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 
 उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भवड यांनी आपघात स्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.  आपघातानंतर बघ्याची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतुक ठप्प झाली. अधिक तपास भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत. या घटनेची फिर्याद संतोष विलास शेंडे यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे.
रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते .


Post a Comment

0 Comments