Type Here to Get Search Results !

आर.आर. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते पांडुरंग यमगर जिल्हा परिषद रिंगणात


भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


ढालगांव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, जनमानसात लोकप्रिय आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग यमगर (शेठ) आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ढालगांव आणि चोरोची परिसरातून सर्वसामान्य जनतेकडून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री कै. आर.आर. (आबा) पाटील यांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली होती. मात्र, या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून आबांच्या विचारांना प्रामाणिकपणे वाहून घेणारे कार्यकर्ते म्हणून पांडुरंग यमगर यांचे नाव विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

कवठेमहांकाळ पूर्व विभागात यमगर शेठ यांनी आपल्या शांत, प्रामाणिक व लोकाभिमुख कामकाजामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांच्या अडचणीत धावून जाणारा, जमिनीशी जोडलेला आणि जनतेच्या भावना ओळखणारा असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेने जनतेत उत्सुकता वाढली आहे.

माजी आमदार सुमनताई आर.आर. पाटील, विद्यमान आमदार रोहित (दादा) पाटील, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश (भाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग यमगर यांनी मागील काही वर्षांत ढालगांव विभागात अनेक लोकोपयोगी विकासकामे हाती घेतली. २००९ पासून सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी चोरोची गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते, पाणीपुरवठा, मंदिर विकास आदी कामे केली.

तसेच श्री संत बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी २००७ साली चोरोची येथे श्री संत बाळूमामा मंदिराची स्थापना केली असून, आजही अन्नदान, वृक्षलागवड आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग कायम आहे.

ढालगांव गटातील ही लढत आता एकतर्फी न राहता, दमदार आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने लोकभावनेचा आदर करून पांडुरंग यमगर यांना संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाऊन पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments