पलूस (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपातळीवरील विकास कामांना गती मिळावी, ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा या उद्देशाने जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे साहेब यांनी सांडगेवाडी ता.पलूस ग्रामपंचायतीस भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी आयुष्यमान भारत कार्डांचे वाटप, ग्रामपंचायतीसाठी लोकवर्गणी पावत्यांचे वितरण, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विकासकामांचा शुभारंभ तसेच लक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नरवडे यांनी ग्रामपंचायतीच्या प्रगतीशील कामकाजाचे कौतुक करत आगामी काळात ग्रामविकास अधिक गतीमान करण्याचे आश्वासन दिले. “समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासनाचे नसून ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग हेच या अभियानाचे खरे बलस्थान आहे. प्रत्येक गावाने विकासाची दिशा स्वतः ठरवून योजनांचा योग्य उपयोग करून घ्यावा,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती पलूसचे गटविकास अधिकारी कदम साहेब, विस्तार अधिकारी खाडे साहेब, सरपंच अमर वडार, उपसरपंच भिंगारदिवे,ग्रामपंचायत अधिकारी अजित माने, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनील बापू सूर्यवंशी, श्री. अरुण शिंदे, श्री. सतीश शिंदे, श्री. किरण अधिक माळी, सौ. आशा अशोक सूर्यवंशी, सौ. शोभा अशोक सांडगे, सौ. शितल अवधूत तरटे, सौ. कल्पना राजाराम वडार तसेच सर्व सदस्य,कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments