भिलवडी (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी ता.पलूस येथील मुख्य बाजारपेठेत विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी अरिहंत बझारचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या बझारचे सर्वेसर्वा दादासो आप्पा व्हसुकले, सुदर्शन व्हसुकले आणि भाग्येश व्हसुकले तसेच व्हसुकले परिवार असून, या बझारच्या माध्यमातून भिलवडी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व स्वच्छ किराणा माल होलसेल आणि रिटेल दरांमध्ये उपलब्ध होणार आहे.
शुभारंभ प्रसंगी भाग्येश व्हसुकले यांनी सपत्नीक विधीवत पूजन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून अरिहंत बझारचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनावेळी अनेक व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा बझार भिलवडी व आसपासच्या गावांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात लोकांना परवडणाऱ्या दरात, तसेच विश्वासार्ह दर्जाची उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या बझारचा मुख्य उद्देश असल्याचे दादासो आप्पा व्हसुकले, सुदर्शन व्हसुकले आणि भाग्येश व्हसुकले यांनी सांगितले.
अरिहंत बाजारमध्ये ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व प्रकारचा किराणा व घरगुती साहित्य उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या सोयीसाठी होलसेल व रिटेल दरातील लवचिकता ठेवण्यात आली असून, यामुळे शेतकरी व लहान व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे. यावेळी मान्यवरांनी व्हसुकले कुटुंबीयांचे अभिनंदन करत शाल, पुष्पगुच्छ देऊन बझारच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भिलवडी येथील उद्योजक डीसी पाटील, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे, प्रविण उर्फ भैय्या चिंचवडे, प्रमोद ऐतवडे, योगेश निकम, सुनील पाटील दाजी, शितल चोपडे तसेच सांगली येथील व्यावसायिक प्रकाश मालपाणी, सौ.प्रेमा मालपाणी,संदीप पाटील, विशाल जगदाळे, ओंकार चिवटे, सुरेश जाधव,संजय आडमुठे, श्रीराम मालपाणी, कासेगाव येथील
महेश पाटील,आष्टा येथील रविंद्र विभूते ,महेश मालगावे, वाळवा येथील नितीन काडगे यांच्यासह सांगली, सावळवाडी माळवाडी तसेच भिलवडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments