भिलवडी( सत्यवेध न्युज )
पंकज गाडे 9890382041
भिलवडी ता.पलूस येथील
उत्तर भाग भिलवडी विकास सोसायटीची
१०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळी-मेळीत पार पडली. या सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत आनंदराव पाटील (राजू दादा) हे लाभले तर अध्यक्षस्थानी रमेश गणपतराव पाटील हे होते.
या सभेत संस्थेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेण्यात आला. सध्या संस्थेचे भागभांडवल एक कोटी ३१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दहा टक्के लाभांश सभासदांना जाहीर करण्यात आला.शैक्षणिक गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा यावेळीही जपण्यात आली.
दहावीतील आदित्य अभिजीत जाधव व शितल धनंजय मस्कर,बारावी कला शाखेतील सानिका सुभाष माळी व धनश्री अनिल औताडे,वाणिज्य शाखेतील पल्लवी सुरेश चौगुले व वैष्णवी वैभव तोरस्कर,विज्ञान शाखेतील साक्षी अधिकराव कुर्लेकर व श्रद्धा संतोष शिंदे
तसेच SET मध्ये यश मिळवणारी अदिती माने व NEET परीक्षेत ९५% गुण मिळवणारी प्रियांका गोरे यांचाही सन्मान यशवंत आनंदराव पाटील (राजू दादा) व रमेश गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या सर्वसाधारण सभेसाठी चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव, विजय पाटील, मोहन पाटील, बी.डी. पाटील, राजेंद्र पाटील, विलास पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व आभार प्रदर्शन चेअरमन रमेश गणपतराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक बी.डी. पाटील तर वार्षिक अहवाल सचिव आदिनाथ सायमोते यांनी सादर केला.

Post a Comment
0 Comments