भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
*नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी भिलवडी येथील भुवनेश्वर देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भुवनेश्वरी मंदिरामध्ये पार पडलेल्या सर्व धार्मिक विधीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.*
*संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या प्रचंड पावसाने मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या सुरू असलेला नवरात्रीचा हा सण महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकरी कुटुंबांना उत्साहाने साजरा करता आला नाही.*
*त्यामुळे आई जगदंबा, तुळजाभवानी, महालक्ष्मी देवीला प्रार्थना करतो की येणाऱ्या दसरा, दिवाळीच्या रूपाने राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी असे साकडे पलूस कडेगावचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीकडे घातले.बुधवार दिनांक १ऑक्टोबर रोजी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली यांच्यासह सपत्नीक भिलवडी येथील माता भुवनेश्वरीचे दर्शन घेतले.यावेळी स्वप्नालीताई कदम यांनी भुवनेश्वरी मातेची खना नारळाने ओटी भरून, माता भुवनेश्वरी चे दर्शन घेतले.त्याचबरोबर दोघांनीही भुवनेश्वरीच्या आरती मध्ये सहभागी होत, महाराष्ट्रावर अतिवृष्टीच्या रूपाने आलेल्या आसमानी संकटावर मात करीत शेतकऱ्यांना नवीन उभारी मिळू दे अशी प्रार्थना केली. यावेळी भुवनेश्वरी देवस्थान समितीच्या वतीने आमदार डॉक्टर विश्वजीत कदम व स्वप्नालीताई कदम यांचा सत्कार करण्यात आला.*
*यावेळी भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हारूण रशीद मुल्ला, युवा नेते प्रतीक संग्राम पाटील, चंद्रकांत भाऊ पाटील, शहाजी भाऊ गुरव,विजयकुमार चोपडे आण्णा, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार,बी.डी.पाटील, बाळासो मोरे,सनी यादव, राहुल कांबळे अंकलखोप गावचे युवा नेते सतिश आबा पाटील यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच भिलवडी भुवनेश्वरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*



Post a Comment
0 Comments