Type Here to Get Search Results !

*दलित महासंघाचे विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्याच्या खड्ड्यात झोपून निषेध*


 तासगाव ( सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041


विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डयामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.सदर अपघातामध्ये अनेकजण मृत्यमुखी पडत आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे भरण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे भरले जात नाहीत. तेंव्हा दलित महासंघ (मोहिते गट) वतीने राज्याध्यक्ष प्रशांत केदार,युनुस कोल्हापूरे यांचे नेतूत्वाखाली विटा- तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यात झोपून व वृक्षारोपण करून निषेध आंदोलन करण्यात आले.

      यावेळी वसंतदादा पाटील कॉलेज समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोपून जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचा व अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला.

      राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.महाजन यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे.तासगाव-विटा-म्हैसाळ हा जवळपास 65 कि.मी रस्ता आहे.सदर रस्ता कर्नाटक राज्यासह सोलापूर,सांगली,सातारा जिल्ह्याला तसेच कराड-नागज,,कराड-जत,,आणि रत्नागिर-नागपूर रस्त्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे.पूर्वी विटा ते कुमठे फाटा रस्ता जुना राजमार्ग होता.2017मध्ये सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला  आहे.

    सद्य स्थितीत विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. रस्त्यावर पुर्वीपेक्षा दुचाकी व चारचाकी तसेच जड वाहतूकीची वर्दळ वाढलेली  आहे.सदर रस्त्यावरील लहान-मोठ्या खड्डयामुळे वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत.खड्ड्यांची लांबी,रुंदी व खोली जास्ती आहे.परिणामी दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी खड्डयामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे अपघात झाले आहेत.अपघातामध्ये अनेक नागरिकांनी निष्पाप प्राण गमावले आहेत.काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

     या रस्त्यावरील खड्डयामुळे झालेल्या अपघातामधील कुटुंबियांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही.याउलट संवेदनाहीन अधिकारी अपघाताच्या घटनाकडे गांभीर्याने पाहत नाही.अपघाताची केवळ पोलीस दफतरी नोंद होते.परंतु अपघातामधील मृत्यमुखी पडलेल्या नागरिकाच्या कुटुंबाला महामार्ग किंवा शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही.

     विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करावे.खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ मुरुमीकरण करून जुजबी मलमपट्टी केली जाते. खड्डे भरणे संदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे भरण्यास टाळाटाळ केली जाते.तेंव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ खड्डे भरावेत.अन्यथा रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडल्यास संबधित अधिकारी यांचेवर तासगाव पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता महाजन यांना निवेदनाद्वारे राज्याध्यक्ष प्रशांत केदार,युनूस कोल्हापूरे यांनी दिला आहे.

     आंदोलनावेळी जिल्हा संपर्क युनूस कोल्हापूरे,निशांत आवळेकर,म.आ.जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई सालपे,तासगाव तालुकाध्यक्षा प्रमिला गावडे,खानापूर तालुकाध्यक्ष ऋषीकेश,कुलदीप वारे, पिलू वारे,साकेत कोल्हापूरे,सोन्या हलगीवाले, रामा वारे,गुरुनाथ दाभाडे,नासिर चौगुले, सुजल कांबळे,धीरज वारे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments