Type Here to Get Search Results !

मनपाच्या फटाके परवाना घोटाळ्यावर दलित महासंघाचा रोष — आमरण उपोषण, रास्ता रोकोचा इशारा


सांगली(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका हद्दीत फटाके विक्रीसाठी बेकायदेशीर परवाने देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत,त्याचा निषेध म्हणून दलित महासंघाच्या वतीने गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.


याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये दलित महासंघाने आरोप केला आहे की, मनपाच्या अग्निशामक विभागातील प्रभारी अग्निशामक अधिकारी सुनिल माळी यांनी शासनमान्यता आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाविना फटाके स्टॉल व साठ्यांना बेकायदेशीर परवानगी दिली. या कारभारात कोल्हापूर सेंट्रल फायर ऑफिसर मनिष रणभिसे यांनीही डोळेझाक केली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दलित महासंघाने दोन्ही अधिकार्‍यांवर सी.आय.डी.मार्फत सखोल चौकशी करून जबाबदार धरावे, तसेच भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केली. त्याचबरोबर
अग्निशामक विभागाच्या "आग सुरक्षा निधी" खात्यातील निधीची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली.
याबाबत बोलताना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांनी सांगितले की, अशा बेकायदेशीर परवानग्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी फटाके साठ्यांमुळे दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे असे परवाने देताना संबंधित प्रशासनाने समाजहित जोपासणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम दादा मोहिते यांच्या नेतृत्व तसेच मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य निरीक्षक विजय घाडगे, मिरज तालुका अध्यक्ष रोहित म्हैशाळे,रवी ऐवळे हे आमरण उपोषणाला बसले.
यावेळी युवक राज्याध्यक्ष प्रशांत केदार, आर्थिक आघाडी राज्याध्यक्ष डॉ.आकाश कांबळे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगधने, महिला उपाध्यक्षा अनुराधा जगधने, सांगली जिल्हा शहराध्यक्ष मल्हारी चव्हाण, अर्जुन मोहिते, राम लोंढे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, तसेच सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
जर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर  आंदोलनकर्त्यांना काहीही झाले तरी  सदरचे बेमुदत आमरण उपोषण बंद करणार नाही. तसेच यापेक्षा तीव्र आंदोलन छेडून, युवक आघाडी राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम दादा मोहिते यांनी प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments