Type Here to Get Search Results !

भिलवडीच्या राजकारणात खळबळ — मोहन नाना तावदर अपक्ष उमेदवारीस तयार”


भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041


सांगली जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले. यामध्ये पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्याने, या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारकी मिळण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु पूर्वी केलेल्या कामाच्या आधारावर पक्षाने तिकीट नाही दिले तरी अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा निर्धार भिलवडी येथील माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांनी केला आहे.


भिलवडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर हे १९९५ पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी सलग दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पदी सर्वोत्कृष्ट काम केले. या दरम्यान त्यांनी उपसरपंच पद ही भूषवले.
गावातील मूलभूत सुविधा तसेच सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
2005, 2019 व  2021 साली आलेल्या महापुरामध्ये मोहन तावदर यांनी गोरगरीब जनतेला मदत मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वारंवार येणाऱ्या पुरामध्ये लोकांची सोय करण्यासाठी ते दिवसरात्र प्रयत्नशील असतात. पुरग्रस्तांचे स्थलांतर, निवारा, जेवणाची सोय हे कार्य आजही ग्रामस्थांच्या लक्षात आहे.


त्यांच्या पत्नी आशाताई तावदर यांनी देखील यापूर्वी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होत्या. 1995 सालापासून समाजकार्य व राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या मोहन तावदर नाना यांना काँग्रेस पक्षाने पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेवर निवडणूक लढवण्याची किंवा एखाद्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी न दिल्याने दुखावल्या गेलेल्या तावदर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. तावदर यांच्या या भूमिकेने भिलवडी येथील राजकारण मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments