भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
महाराष्ट्रात काही भागांत या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पशुधन व शेत-शिवाराच्या झालेल्या नुकसानातून आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी चितळे डेअरीने पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. मुंबईत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश चितळे डेअरीतर्फे सीनियर मॅनेजिंग पार्टनर श्री. श्रीपाद चितळे, श्री. विश्वास चितळे व मॅनेजिंग पार्टनर श्री. निखिल चितळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.चितळे डेअरी गेल्या ८६ वर्षांपासून दुग्धव्यवसायासोबतच समाजकार्यातही सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे. कोविडसारख्या जागतिक महामारी; तसेच पूरसारख्या स्थानिक आपत्तींमध्येही संस्थेने शेतकरी बांधवांसोबत कायम खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात दिला आहे.
“शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. या वर्षी राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि पुनर्बांधणीसाठी हातभार लावणे ही आमची जबाबदारी आहे,” असे चितळे डेअरीचे मॅनेजिंग पार्टनर श्री. निखिल चितळे यांनी सांगितले.
-----------
फोटो ओळ
मुंबई: अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या मदतीसाठी चितळे डेअरीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचा धनादेश देताना (डावीकडून) विश्वास चितळे, निखिल चितळे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व श्रीपाद चितळे.

Post a Comment
0 Comments