![]() |
भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत भिलवडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये तब्बल ३४८ महिलांची विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
शुक्रवार दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत भिलवडी व आयुष्यमान आरोग्य मंदिर भिलवडी यांचा संयुक्त विद्यमानाने स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण ३४८ महिलांची रक्त तपासणी ,HB ,BP, क्षयरोग तपासणी तसेच योगा प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हारूण रशीद मुल्ला,ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य , वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर कांबळे, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे,तालुका आरोग्य सहाय्यक श्रीनिवास कुलकर्णी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शहनाज सय्यद,रूपाली साळूंखे,औषध निर्माण अधिकारी अर्चना जाधव, आरोग्य सहाय्यक बाळू भंडारे, सतिश ननावरे,आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , कनिष्ठ सहाय्यक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, परिचर, रुग्णवाहिका वाहक , योगा प्रशिक्षक , अंगणवाडी सेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments