Type Here to Get Search Results !

न भूतो न भविष्यती… दलित महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक मोर्चा


सांगली(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


नेहमी वेगवेगळी अनोखी आंदोलने करून, सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'न भूतो न भविष्य तो' असे ऐतिहासिक साडी टमरेल मोर्चा आंदोलन करून, इंदिरानगर वासीयांच्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
सांगली येथे दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने इंदिरानगर परिसरातील नागरिकांना तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी साडी-टमरेल निदर्शने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गारपीर चौकातून सुरू होऊन पुष्पराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.



इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ड्रेनेज व शौचालय सुविधा, मागासवर्गीय जीआरनुसार प्रत्येक कुटुंबाला मोफत नळ कनेक्शन, झाडलोट, गटार स्वच्छता, रस्त्यांचे डांबरीकरण, बालवाडी तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष पदाधिकारी यांनी ही साड्या नेसून, तसेच अंगामध्ये गाऊन घालून, कपाळावरती कुंकू लावून, हातामध्ये टमरेल घेत, जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.



या मोर्चामध्ये दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम दादा मोहिते यांच्या उपस्थितीत राज्य संपर्कप्रमुख वनिताताई कांबळे, चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉ. महावीर चंदनशिवे, पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगधने व पश्र्चिम महिला उपाध्यक्ष अनुराधा जगधने, राज्याध्यक्ष प्रशांत केदार, जिल्हा महिला अध्यक्ष विजयाताई माळी, जिल्हा संपर्कप्रमुख युनुसभाई कोल्हापुरे, निशांत आवळेकर, केशव कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष सचिनभाऊ मोरे,युवक अध्यक्ष राजन कदम, जिल्हा नेते पिलू वारे, प्रवीण वारे, अर्जुन मोहिते, अनिल चौगुले, वैभव कोले, अक्षय चौगुले, रामभाऊ वारे,विकास वारे, रोहित म्हैशाळे, साहील गायकवाड,सोन्या हालगीवाला आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
साडी टमरेल मोर्चाच्या माध्यमातून इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या समस्या व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. दलित महासंघ मोहिते गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वाराजवळ जोरदार निदर्शने केल्यानंतर,संबंधित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांचे नावे निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांच्याकडे दिले.

Post a Comment

0 Comments