भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे
कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत अखेर काहीसा दिलासा मिळू लागला आहे. भिलवडी येथील बाजारपेठेतील पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली असून ती हळूहळू खाली येत आहे.गेल्या काही दिवसांपासून नदीत सतत वाढ होत असल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने आणि वरच्या धरणांतून विसर्ग नियंत्रित ठेवल्याने पाणी पातळी उतरण्यास सुरुवात झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये अद्यापही पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
Post a Comment
0 Comments