भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीची मदत मिळावी यासाठी २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले आहे अशा लोकांना तातडी जी दहा हजार रुपयांची मदत शासनाच्या वतीने करण्यात येणार असून, ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांना शासन नियमानुसार मदत करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे त्या ठिकाणच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यांनाही तात्काळ मदत मिळणे कामी शासन प्रयत्नशील आहे.
असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले ते भिलवडी येथे पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर व भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रथम त्यांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिरामध्ये जावून, तेथील पूरस्थितीची माहिती घेऊन, गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेतले त्यानंतर भिलवडी मौलाना नगर येथील पूरबाधित घरांची पाहणी केली.
त्यानंतर त्याने सेकंडरी स्कूल भिलवडी येथील निवारा केंद्रावर आश्रयास असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी भेटून संवाद साधला. यावेळी पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनाबाबत आहे त्याच जागी किंवा सदर लोकांच्या सोयीच्या दृष्टीने पुनर्वसन करण्याकरिता जागेची निवड करण्याच्या सुचना प्रांताधिकारी रणजीत भोसले यांना केल्या. यावेळी प्रकल्प संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नंदिनी घाणेकर, तहसीलदार दीप्ती रिठे, मंडळ अधिकारी अनिल हांगे, तलाठी सोमेश्वर जायभाय,सरपंच सौ शबाना हारुण रशिद मुल्ला आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या या भेटीमुळे पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तसेच वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या लोकवस्तीचे लवकरच पुनर्वसन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Post a Comment
0 Comments