Type Here to Get Search Results !

पूरग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन करावेच लागेल: आ.डॉ.विश्व्जीत कदम


 भिलवडी (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041






पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी भिलवडी येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त व्यापारी व ग्रामस्थांची माहिती घेतली.



नुकत्याच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे
भिलवडीतील मुख्य बाजारपेठ पाण्यामध्ये गेली तर लोकवस्तीचा भाग पाण्याखाली गेला. यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. त्यांची सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे राहण्याची सोय करण्यात आली. शनिवारी आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी या पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.




 यावेळी त्यांनी मुख्य बाजारपेठेतील पुरबाधित दुकानांना भेटी दिल्या. त्याचबरोबर सेकंडरी स्कूल भिलवडी येथे वास्तव्यास असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. येथे वास्तव्य असणाऱ्या काही आजारी लोकांचीही आमदार कदम यांनी आपुलकीने विचारपूस केली..



यावेळी आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधताना, सातत्याने पुराच्या पाण्याने प्रभावित होणाऱ्या पूर भागातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची वेळ काळाने आपल्यावर आणली आहे. शासनाच्या धोरणानुसार व नियमानुसार हे  पुनर्वसन होणे गरजेचे आहे. पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागातील काही गावातील लोकांचे पुनर्वसन करावे लागेल. मी पालकमंत्री व शासन यांच्याशी याबाबत पाठपुरावा करेन त्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.



यावेळी प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार दिप्ती रिठे, गटविकास अधिकारी राजेश कदम, विस्ताराधिकारी दिनेश खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, मंडल अधिकारी अनिल हांगे,तलाठी सोमेश्वर जायभाय, ग्राम विकास अधिकारी कैलास केदारे, यांच्यासह सरपंच सौ शबाना हारुण रशिद मुल्ला, माजी सरपंच विजयकुमार चोपडे, शहाजी गुरव, राहुल कांबळे, युवा नेते प्रतीक संग्राम पाटील , माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच रशीद मुल्ला, अमरजीत राजवंत, बाळासाहेब महिंद पाटील, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, रमेश पाटील, सचिन नावडे, बाळासाहेब मोरे, सचिन पाटील,जावेद तांबोळी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सेकंडरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पूरग्रस्त ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments