Type Here to Get Search Results !

आष्टा येथे दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी, दोन तरुण गंभीर


आष्टा (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041



सांगली- पेठ महामार्गावरील  आष्टा जवळील शिंदे मळ्यानजीकच्या राज पेट्रोल पंपाजवळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. 




इस्लामपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आल्याने हा अपघात झाला. धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर कोसळून जखमी झाले. त्यांना तात्काळ स्थानिक ग्रामस्थ प्रज्वल शिंदे आणि सहदेव माळी यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच उपवन संरक्षक सागर दवते आणि वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दादासाहेब बर्गे, रेस्क्यू टीमचे युनुस मणेर, निवास उगळे, विक्रम टिबे आणि विजय मदने हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमी बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments