भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी परिसरातील पूरस्थितीनंतर प्रकल्प संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नंदिनी घाणेकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली.
भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक प्रशासनाने केलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला व तातडीने कोणत्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. निवाऱ्यांची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी, वैद्यकीय व पशुवैद्यकीय सेवा याबाबत सविस्तर माहिती घेतली. जनावरांसाठी चारापाणी व लसीकरणाची व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.
सध्या पाण्याची पातळी स्थिर असून प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॉ. घाणेकर यांनी केले. या पाहणी दौऱ्यात पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम, विस्तार अधिकारी दिनेश खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, कनिष्ठ शाखा अभियंता सुनिल वाघमारे व भिलवडीचे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments