Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसामुळे अंकलखोप येथील खोपेश्वर महादेव मंदिराचे शिखर कोसळले; मंदिर धोकादायक

 



अंकलखोप (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


 पलूस तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंकलखोप येथील ग्रामदैवत खोपेश्वर महादेव मंदिराचे शिखर कोसळले आहे. एस.टी. स्टॅण्ड शेजारील हे मंदिर मोठ्या भगदाडामुळे धोकादायक झाले असून दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यास ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे.शिखर कोसळल्याने मंदिराच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. पुढील काही भाग कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत  अंकलखोप तर्फे सूचनापत्र जारी करून सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुढील उपाययोजना होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments