इस्लामपूर(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील आता बोलायला उभं राहातील असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचक श्रीकांत माने यांनी म्हटलं, यावरून अजित पवार यांनी सूत्रसंचालकाची जोरदार फिरकी घेतली.
सूत्रसंचलाकांनी सांगितलं. आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील. आम्ही काय देखणे नाही का. च्या आयला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्याने करायची. ते देखणे आणि आम्ही काय बिन देखणे आहोत? तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येतोय, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं, सोबतच त्यांची चौफेर फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
ज्यांना अजितदादांनी भर कार्यक्रमात दम भरला ते निवेदक म्हणजे श्रीकांत माने.
कुंडलमधील श्रीकांत माने हे गेली 20 वर्षे सूत्रसंचालक म्हणून परिसरात ओळखले जातात. राजकीय-सामाजिक सभा संमेलने , साहित्य संमेलने , शेतकरी मेळावा , व्याख्यानमाला , पुरस्कार प्रदान सोहळ्यांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भूमिका ह्या अनियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्यक्तींचे व संस्थांचे विशेषांक संपादित केलेले आहेत. नुकताच त्यांनी पलूस तालुक्याचा रौप्यरत्न हा रौप्यमहोत्सवी विशेषांक संपादित केला आहे.




Post a Comment
0 Comments