Type Here to Get Search Results !

ग्रीन पॉवर शुगर, गोपूज येथे मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न


कडेगाव(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


 दि.१८   गोपूज (ता. खानापूर) : ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड, गोपूज या साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामाचा शुभारंभ मिल रोलर पूजनाने झाला. सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला.



यावेळी कारखान्याच्या चेअरमन सौ. अपर्णाताई देशमुख, मा. जयदीप भाऊ देशमुख, विश्वतेज दादा देशमुख, जयराज दादा देशमुख, संचालक मंडळ सदस्य चंद्रकांत मोरे, अमर यादव, सागर यादव, लालासाहेब यादव, मयूर कदम, प्रकाश नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.



कारखान्याचे जनरल मॅनेजर मा. झुंजार असबे, केन जनरल मॅनेजर मनोहर मिसाळ, फायनान्स जनरल मॅनेजर एच. व्ही. पाटील, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, ओएसडी विजय जगताप, चीफ इंजिनिअर महादेव गारळे, चीफ केमिस्ट विठ्ठल ठोंबरे, डिस्टलरी मॅनेजर अशोक कदम, सिव्हिल इंजिनिअर सुनील पवार, लेबर ऑफिसर विनोद यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




रोलर पूजनानंतर मान्यवरांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकरी व सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Post a Comment

0 Comments