Type Here to Get Search Results !

भिलवडीचा वाघ’ स्व. संग्राम दादा पाटील यांना सर्वपक्षीय मान्यवरांची श्रद्धांजली


भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041



भिलवडी गावचे लोकनेते, धाडसी नेतृत्वाचे प्रतीक व शेतकरीहितासाठी झटणारे युवा नेते स्व. संग्राम दादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ व मान्यवरांचा मोठा जनसागर भिलवडी येथे जमला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. डी. पाटील यांनी करताना दादांच्या कार्याचा आढावा घेतला.उपस्थितांचा स्वागतपर सत्कार भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजू दादा पाटील व  युवा नेते प्रतिक संग्राम पाटील यांनी केला. खा. विशाल पाटील, आ.डॉ. विश्वजीत कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी,महेंद्र (आप्पा)लाड, उद्योजक विश्वास चितळे, जे के बापू जाधव,. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते, राज्य युवक आघाडी अध्यक्ष प्रशांत केदार,सरपंच शबाना हारुण रशीद मुल्ला, संदीप राजोबा, महेश खराडे, दलित महासंघाचे युनूस कोल्हापूरे,निशांत आवळेकर,यांच्यासह विविध क्षेत्रातील
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




संग्राम दादांच्या आठवणी ताज्या करताना सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांनी संग्राम दादांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकला. दादांना जनसेवेचे व राजकीय धडे बाळासाहेब काकांनी दिले होते. धाडसी व्यक्तिमत्व, ठाम भूमिका आणि प्रखर नेतृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब काकांचे व दादा घराण्याचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते याचा त्यांनी खुलासा केला.
यावेळी बोलताना,आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी भावनिक स्वरात  दादांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले,


"संग्राम दादांना ‘स्वर्गीय’ म्हणतानाच अंगावर काटा येतो. साहेब त्यांना नेहमीच ‘माझा भिलवडीचा वाघ’ म्हणायचे. त्यांच्यात एक वेगळेच धाडस होते. ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, तळमळ समजून घेणारा नेता म्हणजे संग्राम दादा. त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे."अशा भावना विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले तसेच प्रतिकला पाहिल्यानंतर संग्राम दादांची आठवण येते असेही भावोद्गार विश्वजीत कदम यांनी काढले.




तर यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, संग्राम दादांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निपक्षपणे भूमिका बजावली. त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा होता. दोन वर्षांपूर्वी आम्ही काढलेल्या पद यात्रेला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता तसेच भिलवडी येथे आल्यानंतर पदयात्रेमधील सहभागी शेतकऱ्यांची सर्व व्यवस्था त्यांनी बघितली होती. त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला हा पुरस्कार मिळेल असे कधी वाटले नव्हते.
"शेतकऱ्यांचे संकट अजून संपलेले नाही. काही कारखानदारांनी माझा सत्कार केला म्हणून संघर्ष संपणार नाही. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी नेहमीच आम्ही अग्रेसर राहू, संग्राम दादांनी शेतकरी चळवळीला दिलेली साथ पुढे चालू ठेवणे, हिच संग्राम दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.



शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी खा. विशाल पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते  माजी खासदार राजू शेट्टी यांना स्व.संग्राम दादा पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच शेतकरी चळवळीला बळ मिळावे म्हणून निधी देण्यात आला.
यावेळी विजयकुमार चोपडे,अमित पाटील, नंदकुमार कदम (दादा), बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, ओंकार पाटील,अमरजीत राजवंत,सुरेंद्र वाळवेकर,रशिद मुल्ला, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, माणिक (तात्या) माने, सुनिल (बापू)जाधव, राजेश जाधव यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी,, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते,विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केले तर आभार भिलवडी गावचे माजी सरपंच राहुल कांबळे यांनी मानले

Post a Comment

0 Comments