Type Here to Get Search Results !

गुणवंत विद्यार्थ्यांचा व वारकऱ्यांचा खंडोबाचीवाडीत सत्कार सोहळा



खंडोबाचीवाडी (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


खंडोबाचीवाडी (ता. पलूस) – येथील गुणवंत विद्यार्थी व निष्ठावान वारकरी सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्तांचा सन्मान करण्यात आला.




या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडलचे चेअरमन मा. श्री. शरदभाऊ लाड होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी, पंचायत समिती पलूस येथील मा. श्री. राजेश कदम तर विशेष उपस्थिती म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. भगवान पालवे यांनी लाभ घेतला.



या प्रसंगी खंडोबाचीवाडी येथील सर्व सरपंच, उपसरपंच, खंडेश्वरी पाणीपुरवठा संस्था, गुणवंत विद्यार्थी, वारकरी, भजनी मंडळे, पारायण मंडळे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल शिंदे, वसंत धनवडे, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रणजीत बागल, माजी तंटामुक्त अध्यक्ष हनमंत शिंदे, अमोल शिरतोडे, अॅड. चेतन्य वावरे, ह.भ.प. श्री. संजय वावरे, ह.भ.प. अशोक चेंडगे, दिनेश शिंदे, लखन जाधव, शुभम जाधव, बाबालाल इनामदार, शंकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या सोहळ्याने गावामध्ये सामाजिक ऐक्य, पारंपरिक श्रद्धा आणि शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments