Type Here to Get Search Results !

अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी मर्या.अंकलखोपची निवडणूक बिनविरोध




अंकलखोप (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


 दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सहाय्यक निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री. सचिन भी. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत, सलग दुसऱ्यांदा माननीय श्री. राजेश बापूसाहेब चौगुले यांची चेअरमनपदी आणि माननीय श्री. रघुनाथ मारुती गडदे यांची व्हा. चेअरमनपदी निवड झाली.

निवडीनं तरर आपले मनोगत व्यक्त करताना संस्थापक चेअरमन श्री. राजेश चौगुले म्हणाले,अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या., अंकलखोपची स्थापना ९ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली. स्थापनेपासूनच पारदर्शक कारभार, सभासदांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती या बळावर संस्थेने अल्पावधीतच आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.संस्थेने अल्पावधीतच ठेवींचा ६३ कोटींचा टप्पा पार केला असून, लवकरच १०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत ४२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून, वसूल भागभांडवल २.६१ कोटी आणि गुंतवणूक १५ कोटी इतकी आहे. एकूण सभासदसंख्या ३८७२ असून, मार्च २०२५ अखेर संस्थेला १ कोटी ५ लाख रुपयांचा नफा झाला आहे.”संस्थेने नुकत्याच पाच नवीन शाखा सुरू केल्या असून, शेतकरी सभासदांसाठी अंकलखोप, आष्टा आणि वसगडे येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना खते, औषधे, बी-बियाणे तसेच ऊस नर्सरीतून उच्च प्रतीचे फाउंडेशन बियाणे पुरवले जात आहे, ज्यामुळे पीकउत्पादन व उत्पन्नवाढीस मोठी मदत होत आहे.या विशेष प्रसंगी संस्थापक चेअरमन, व्हा. चेअरमन आणि निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री. सचिन पाटणकर व   नवनिर्वाचित संचालक श्री .सुभाष चौगुले,श्री.सुरेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संचालक मंडळातील श्री. राजेंद्र कुंभार, आप्पासो सकळे, अरुण सावंत, डॉ. उमेश चौगुले, सुभाष चौगुले, विकासराव सूर्यवंशी, सुरेश जोशी, सचिन लांडगे, राजेंद्र मोटकट्टे, मंगल मिरजकर, वंदना कुराडे तसेच मॅनेजर रामगोंडा पाटील उपस्थित होते.अल्पावधीत गगनभरारी घेतलेल्या या संस्थेकडून येत्या काळात अधिकाधिक सामाजिक, आर्थिक आणि कृषीविकासाच्या योजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments