रामानंदनगर (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
रामानंदनगर ता. पलूस् येथे स्वच्छ भारत सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत निवड झालेल्या रामानंदनगर ग्रामपंचायतीची आज केंद्रस्तरीय समितीकडून पाहणी करण्यात आली. समितीने ग्रामपंचायत कार्य, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतेची तपासणी करून बारकाईने निरीक्षण व गुणांकन केले.
पाहणीसाठी ग्रामपंचायतीकडून विशेष तयारी करण्यात आली होती. ग्रामपंचायत सरपंच सौ. माधुरी प्रशांत नलावडे, सदस्य प्रल्हाद शिताफे, भानुदास माने, अजित लोंढे, अमोल तिरमारे, गजानन कडोले, प्रल्हाद शितापे आदी उपस्थित होते. याशिवाय, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, पंचायत समिती पलूसमधील स्वच्छ भारत अभियान कक्षातील कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांनी समितीला आवश्यक माहिती आणि सहकार्य दिले.
या पाहणीदरम्यान ग्रामपंचायतीने राबवलेल्या नियोजनबद्ध व एकात्मिक स्वच्छता उपक्रमांचे समितीने विशेष कौतुक केले. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना आता केंद्रस्तरीय मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments