भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
जीवनात काही नाती रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असतात. ती आपल्याला प्रेरणा देतात, योग्य दिशादर्शन करतात आणि संकटाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभी राहतात. अशाच एका व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे – क्रांतीसूर्य न्यूज चॅनेलचे संपादक, समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी सतत लढणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य उजेडात आणणारे श्री. शशिकांत राजवंत साहेब.
राजवंत साहेब हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि विश्वासू मित्र आहेत. त्यांच्याकडून चांगल्या-वाईट प्रसंगांतून जीवनाचे अनेक धडे शिकायला मिळतात. त्यांच्या कार्यशैलीत ठामपणा, धाडस आणि लोकहितासाठीची तळमळ स्पष्ट दिसून येते. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांच्यात आहे, आणि ती त्यांनी वेळोवेळी सिद्धही केली आहे.
पत्रकार पंकज गाडे सांगतात, "शशिकांत राजवंत साहेब माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी माझ्यावर भावापेक्षाही जास्त प्रेम केले. त्यांच्या मार्गदर्शनातून मी पत्रकारितेतील बारकावे, तसेच जीवनातील अनेक मूल्ये शिकलो आणि अजूनही शिकत आहे."
समाजहितासाठी लढणाऱ्या आणि पत्रकारितेत निडर भूमिका बजावणाऱ्या अशा या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाला आज वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि कार्याची नवी उंची लाभो, हीच प्रार्थना.
शुभेच्छुक - पत्रकार पंकज गाडे



Post a Comment
0 Comments