Type Here to Get Search Results !

हत्तीणीच्या रवानगीविरोधात भिलवडीकरांचा संताप; परत आणण्याची आ.डॉ.विश्व्जीत कदम यांची हमी




भिलवडी(सत्यवेध न्यूज
पंकज गाडे 9890382041

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील अनेक वर्षापासून असणाऱ्या माधुरी हत्तीणीचे पेटाने कोर्टामध्ये दाखल केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या केसमध्ये कोर्टाने एकतर्फी निर्णय देऊन माधुरी हत्तीणीला वनताराकडे पाठवण्याचा निर्णय दिला.यामुळे जैन व जैनेत्तर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचा गांभीर्याने विचार करून, माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये सन्मानाने परत पाठवावे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी भिलवडी येथे व्यक्त केले ते भिलवडी येथे सर्व धर्मीयांच्या वतीने आयोजित मूक मोर्चाला संबोधित करताना बोलत होते.




रविवार दि ३ ऑगस्ट २०२५ रोजी नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची गुजरातच्या वनतारा प्रकल्पात रवानगी केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्याकरिता भिलवडी येथे जैन व जैनेत्तर लोकांसह समस्त भिलवडी वासियांच्या वतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. भिलवडी गावातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये लहान मुलांसह पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या मूक मोर्चाची सांगता भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणात झाली. यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भिलवडी वासियांना दिला. यावेळी भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने आ.डॉ. विश्वजीत कदम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,
कोल्हापूर जिल्हयातील श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी ता. शिरोळ येथील माधुरी हत्तीणीला कोणतीही पूर्व सुचना न देता वनतारा जामनगर गुजरातला नेले. नांदणी येथील मठाला ७०० वर्षाची धार्मिक विधी करीता हत्ती पाळण्याची परंपरा आहे. पण पेटाच्या कमीटीने २०२३ मध्ये दिलेल्या भेटीनुसार हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही. असा चुकीचा अहवाल कोर्टास सादर करून कोर्टाची दिशाभूल करुन हत्तीला वनतारा जामनगर गुजरातला पाठवण्याचा निर्णय कोर्टाने दिला याचा आम्ही सर्व भिलवडी व परीसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतोय.




पेटाने दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता कोर्टाने सदरचा निर्णय घेतला आहे. असे ग्रामस्थांचे मत आहे. सदरचा हत्ती वनतारा येथे पाठविल्यामुळे लाखो जैन व जैनेत्तर भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करुन माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठाकडे सुपुर्त करण्यात यावे अशी असंख्य जैन व जैनेत्तर भाविकंच्यामधून मागणी होत आहे. तरी भिलवडी व परीसरातील सर्व ग्रामस्थांच्या भावना राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, खासदार, व आमदार यांना कळवाव्यात ही नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन आ.डॉ. विश्वजीत कदम यांना देण्यात आले. यावेळी सरपंच शबाना मुल्ला, तलाठी सोमेश्वर जायभाय, चंद्रकांत पाटील, विजयकुमार चोपडे, बाळासो मोहिते, सुरेंद्र वाळवेकर, युवा नेते प्रतीक पाटील, मनोज चौगुले, पृथ्वीराज पाटील,शहाजी गुरव,
ऐनुद्दीन उर्फ चया जमादार,जावेद तांबोळी, बाळासो चौगुले, विजय पाटील, रमेश पाटील,बाळासो मोरे यांच्यासह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments