Type Here to Get Search Results !

राज्य शासनाच्या महसूल सप्ताहात वसगडे येथे समाधान मेळावा यशस्वी

 


 भिलवडी ( सत्यवेध न्यूज ) पंकज गाडे 9890382041
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरा होत असलेल्या महसूल सप्ताहाचं औचित्य साधून दिनांक 4 ऑगस्ट रोजी मौजे वसगडे (ता. पलूस) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भिलवडी मंडळातील सर्व गावांसाठी समाधान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.




या मेळाव्यामध्ये विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यामध्ये विशेषतः लक्ष्मी मुक्ती योजना – 23 लाभार्थी, जिवंत सातबारा – 14, संजय गांधी योजना – 15, पुरवठा विभाग – 31, सातबारा दुरुस्ती – 18, सातबारा वाटप – 65, खाते उतारा – 32, फेरफार – 15, उत्पन्न दाखले – 46, ई-पिक पाहणी – 7, आधार सेवेसंदर्भात – 27, तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जंत निर्मूलन व मका बियाणे वाटप – 59 नागरिकांना लाभ देण्यात आला. मंडळ अधिकारी चौकशी अहवाल – 19 प्रकरणांमध्ये पूर्ण करण्यात आला. महा-ई-सेवा केंद्रामार्फत 32 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्याचा विशेष आकर्षण ठरली ती अवयव दान मोहिम. जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत भिलवडी मंडळातील 23 नागरिकांनी अवयव दान करण्याचा निर्धार केला. त्यांना तहसीलदार मा. दीप्ती रिठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. “अवयव दान हे श्रेष्ठ दान असून समाजात मानवतेचा संदेश देणारा निर्णय आहे,” असे त्या प्रसंगी त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी भिलवडी, सर्व तलाठी, तहसील कार्यालयातील संजय गांधी व पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी ओंकार पाटील (सरपंच, खटाव), वृषाली काशीद (सरपंच, वसगडे), अनिल पाटील (उपसरपंच, वसगडे), शशिकांत शिंदे (पोलीस पाटील, वसगडे) यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments