Type Here to Get Search Results !

राज्यातील पोस्ट सेवा ६ ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद; तंत्रज्ञान सुधारणा कामामुळे आर्थिक व्यवहार, मनी ऑर्डर, पेंशन आदी सेवा ठप्प


 *सत्यवेध न्यूज*

पंकज गाडे 9890382041



राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये दिनांक ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत सेवा बंद राहणार आहेत. जुन्या कोअर बँकिंग प्रणालीला नव्या तंत्रज्ञानावर स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक सुधारणा प्रक्रियेत आहे. या कालावधीत  पोस्टल सेवांच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार, मनी ऑर्डर, सॉविंग खाते व्यवहार, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल इन्शुरन्स, पेंशन यासारख्या सर्व सेवा पूर्णपणे बंद राहतील. तसेच नवीन खाती उघडणे, बचत योजना व्यवहार, व वेतन जमा/निवृत्ती वेतन आदी कामेही होणार नाहीत.पोस्ट विभागाकडून देशभरात तांत्रिक सुधारणा प्रकल्प राबवला जात असून, त्याचा एक भाग म्हणून हे स्थलांतर होत आहे. नागरिकांनी या काळात पर्यायी माध्यमांचा वापर करून आपल्या व्यवहारांची पूर्तता करावी, असे आवाहन पोस्ट प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments