भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी (ता. पलूस) येथील श्रीमती विमल महालिंग धोतरे (वय ८५) यांचे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भिलवडी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले श्री. सुरेश महालिंग धोतरे व श्री. संतोष महालिंग धोतरे यांची मातोश्री होत.अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या विमलताईंनी आपल्या कर्तृत्वाने परिवार व समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माती सावरणेचा कार्यक्रम दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता भिलवडी येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहे.
Post a Comment
0 Comments