बुर्ली(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
बुर्ली ता. पलूस येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त पंचशील तरुण मित्र मंडळ (PTM BOYS), बुर्ली यांच्या पुढाकाराने आणि प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, प्रकाशनगर यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी बौद्ध विहार, बुर्ली येथे पार पडलेले हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. या शिबिरात हृदयरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, मानसिक आजार आणि दंतरोग आदी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची सखोल तपासणी केली. यासोबतच एक्स-रे, सोनोग्राफी, एम.आर.आय, सी.टी. स्कॅन, रक्तचाचण्या व शस्त्रक्रिया यांसारख्या सेवा देखील मोफत पुरविण्यात आल्या.
महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, कामगार कल्याणकारी मंडळ योजना आणि प्रकाश आरोग्य योजना अंतर्गत अनेक रुग्णांनी लाभ घेतला. शेकडो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत आपल्या विविध आरोग्यविषयक तक्रारींसाठी मार्गदर्शन आणि उपचार मिळवले.संपूर्ण शिबिराचे आयोजन आणि व्यवस्थापन पंचशील तरुण मित्र मंडळाने अत्यंत नेटकेपणाने आणि जबाबदारीने पार पाडले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. तसेच दरवर्षी असे उपक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments