भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर भव्य आणि रंगतदार होडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नदीकिनाऱ्यावरील नयनरम्य वातावरण, पाण्यावर झेपावणाऱ्या होड्यांची स्पर्धात्मक धाव आणि प्रेक्षकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लब यांनी प्रभावी खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करत पारंपरिक खेळ-स्पर्धा जिवंत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
द्वितीय क्रमांक जय मल्हार बोट क्लब (कसबे डिग्रज) यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक युवा शक्ती बोट क्लब (कवठेसार) आणि चतुर्थ क्रमांक सप्तर्षी बोट क्लब (कवठेपिरान) यांनी पटकावला. त्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुंदर चषक प्रदान करण्यात आले. केवळ विजेत्यांनाच नव्हे तर सर्व सहभागी संघांना प्रोत्साहन म्हणून चांदीची भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यावर वेग, ताकद आणि संघभावनेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. वयस्कर नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत तसेच महिलांनी विशेष उपस्थिती लावली होती. हजारो ग्रामस्थांनी घाट परिसरात मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या जल्लोषमय जयघोषामुळे खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला.
या कार्यक्रमाला हर्षवर्धन प्रतीक पाटील, यशवंत आनंदराव पाटील, प्रल्हाद गडदे, बाळासाहेब मोहिते, विजयकुमार चोपडे, विलास पाटील, चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव, धनंजय पाटील, रमेश पाटील, बि.डी. पाटील, मोहन पाटील, विजय पाटील, पृथ्वीराज पाटील, शबाना मुल्ला, विद्या पाटील, सविता पाटील तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला येथील प्रसिद्ध स्केच आर्टिस्ट लकी गर्क आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन व नियोजन प्रतीक संग्राम पाटील यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन, नियोजनातील काटेकोरपणा व खेळाडूंना दिलेला सन्मान यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयोजकांचे विशेष कौतुक होत आहे.






Post a Comment
0 Comments