तासगाव(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
सावळज (ता.तासगाव) येथे सुसज्ज व सर्व-सेवा सुविधायुक्त स्मशानभूमी उभारावी.त्यासाठी 50 लाख रु निधी आमदारांनी द्यावा.मागणीसाठी दलित महासंघ (मोहिते गट) वतीने आज तासगाव पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्याचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते व राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केले.
मोर्च्याची सुरुवात सिद्धेश्वर चौक-वंदे मातरम चौक-बागणे चौक- बस स्थानक चौक-छ.शिवाजी महाराज स्मारक ते पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पंचायत समिती कार्यालय परिसरात मोर्चा आला असता पोलिसांनी आंदोलकाकडून तिरडी काढून घेतली.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गट हा आदरणीय स्वर्गीय आर.आर.(आबा) पाटील यांचा जि.प.बालेकिल्ला व विधानसभेला प्रचंड मताधिक्याने आघाडी देणारा ठरलेला आहे. गेली अनेक वर्षे सावळज नागरिकांनी एकाच घराला सातत्याने आमदारकी दिली आहे.तरीसुद्धा आज सावळज जि.प.मतदारसंघातील सावळज गावात मरणोत्तर अंत्ययात्रेची स्मशानभूमी दयनीय अवस्थेत आहे.याची मोठी शोकांतिका आहे.
सावळज गावात रस्ते उखडले आहेत.गटारी नाहीत,स्वछता अभाव आहे. नागरिकांना अपेक्षित अशा भौतिक नागरी सुविधा मिळत नाहीत.
त्यात भर म्हणजे सावळज स्मशानभूमी चिंतेचा विषय बनली आहे.सावळज स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढिग पसरले आहेत.त्यातून दुर्गंधीयुक्त वास येत आहे.स्वछतेचा मोठा अभाव आहे.लगतच नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत.परिणामी अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीतून वाट काढत जावे लागत आहे. तसेच स्मशानभूमीचे वरील शेडचे पत्रे सडून गेले आहेत.परिणामी नागरिकांना भर पावसामध्ये उभा रहावे लागत आहे.
तालुक्यातील मोठे असून गावातील स्मशानभूमीत वीज नाही त्यामुळे रात्री-अपरात्री अंत्यसंस्कार करणे नागरिकांना अडचणीचे व त्रासाचे ठरत आहे.स्मशानभूमिकडे जाणारे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती मिळण्याच्या ठिकाणची अत्यंत दयनीय स्थिती आहे.तालुक्यातील इतर अनेंक गावात सर्व सेवा-सुविधा युक्त स्मशानभूमी बनविल्या आहेत.मात्र सावळज ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे स्मशानभूमीचे तीन-तेरा झाले आहेत.
जवळपास 20 हजार लोकसंख्या व मोठी बाजरपेठ असणाऱ्या गावातील स्मशानभूमीची दुरवस्था गावासाठी शोकांतिका आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सावळजमधील लोकप्रतिनिधी यांना स्मशानभूमीचे सोयरे-सुतक नसल्याचे दिसत आहे.
तेंव्हा तासगाव-कवठेमहांकाळचे विद्यमान आमदार मा.रोहित आर.आर.पाटील यांनी तातडीने सावळज स्मशानभूमी नूतनीकरण व सेवा-सुविधासाठी 50 रु लाख रुपये निधी द्यावा.ग्रापंचायत प्रशासनाचा निषेध व लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघ (मोहिते गट) वतीने आज पंचायत समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढल्याचे निवेदनात राज्यध्यक्षा प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते,राज्याध्यक्ष प्रशांत केदार,जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापूरे,विजया माळी, शोभाताई सालपे,निशिकांत आवळेकर,रामा वारे,विपुल सुहासे,अंकुश केंगार,अमन इनामदार,जुनेद चौगुले,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments