Type Here to Get Search Results !

पलूस पंचायत समितीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण




पलूस (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041

पंचायत समिती पलूस येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.




सन २०२४-२५ मध्ये जिल्हा परिषद शाळांमधील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आरोही सुभाष आरबुने (जि.प. शाळा दुधोंडी नं. २) हिची जवाहर नवोदय विद्यालय, पलूस व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे. आयुष सुदाम जामदारे (जि.प. शाळा धनगाव) यांची जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे निवड झाली आहे. केदार सोमनाथ टोमके (जि.प. शाळा बांबवडे नं. १) यांची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे.



गटविकास  अधिकारी श्री. राजेश कदम यांनी तालुक्यातील गुणवत्ता यादीत नाव असलेल्या व नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments