Type Here to Get Search Results !

विशाल कुंभार याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन





दलित समाजातील महिला पोलीस अधिकाऱ्यास अर्वाच्य  भाषेत बोलून विशाल प्रकाश कुंभार याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना शिष्टमंडळाने लेखी नियोजन दिले.

या निवेदन म्हटले आहे की,विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पि.एस आय. जयश्री कांबळे या त्यांचे कर्तव्य बजावण्याकरता विटा येथील कुंभारवाडा परिसरात गेल्या असता, या ठिकाणी वास्तवास असणारे व व्यवसायाने वकिल असणारे विशाल कुंभार यांनी यावेळी कांबळे यांच्या सोबत असणारे कर्मचारी व सोसायटीतील इतर रहिवाशी यांच्या समोर संबंधित दलित महिला पोलीस अधिकारी यांना अपनास्पद वागणूक देऊन, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे समजते.त्याचबरोबर संबंधित विशाल कुंभार याने जयश्री कांबळे यांचेविषयी त्याच्या फेसबुक पेजवर कांबळे यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे.घडलेला प्रकार हा निंदनीय असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत असून,

विशाल कुंभार याच्यावरती तात्काळ ॲट्रॉसिटी अॅक्ट  नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी राजेंद्र खरात जिल्हाध्यक्ष,संजय मस्के कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष, दादासाहेब चंदनशिवे जिल्हाउपाध्यक्ष, बापू सोनवणे जिल्हाउपाधक्ष,सुधीर कांबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष,अविनाश काळीबाग पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष,अमरजीत कांबळे पलूस तालुका कार्याध्यक्ष,यश आयवळे पलूस तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments