Type Here to Get Search Results !

बापूवाडी ग्रामस्थांनी अखेर वादग्रस्त जागेवर घेतला कब्जा.

 रामानंदनगर (सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041

रामानंदनगर(ता.पलूस)येथील रेल्वे गेट क्रमांक ११२ क्रमांक जवळचे कथित अतिक्रमण ७ मे रोजी रेल्वेने पोलिस बंदोबस्तात हटवले होते.तेंव्हापासून गेले ९५ दिवसांपासून त्या लोकांचे विविध प्रकारे आंदोलन सुरू होते.इतक्या दिवसा नंतर देखील न्याय न मिळाल्याने सोमवारी या लोकांनी वादग्रस्त जागेचा कब्जा घेतला.याबाबत पाच जणांना रेल्वे पोलिसांनी नोटीस दिले असून आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक ११२ जवळच्या जागेत गेल्या ७० वर्षापासून इराणी आणि डवरी समाजाची ४३ कुटुंबे म्हणजे जवळपास २५० नागरिक वास्तव्यास होते.परंतु सदरची जागा ही रेल्वेची असल्याचे सांगून मोठ्या पोलिस बंदोबस्तात ९ मे रोजी ४० हून जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.तेंव्हापासून या लोकांनी रामानंदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई मध्ये आश्रय घेतला होता.गेले तीन महिने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने या लोकांनी सोमवारी वादग्रस्त जागेचा ताबा घेतला.तसेच याच ठिकाणी पुन्हा झोपड्या उभारणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकंदरीतच प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.



रेल्वे उड्डाण पुलाच्या कामातील त्रुटी बाबत सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार यांनी जवळपास एक तास भेट दिली होती.मात्र या लोकांच्याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 हिंस्र प्राण्याने फस्त केलेल्या १० मेंढ्यांचा प्रश्न स्थानिक आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केला मात्र २५० लोकांचे चाललेले हाल आज अखेर त्यांना दिसले नाहीत.मग पुढील जन्मी आम्ही मेंढ्यांच्या पोटी जन्माला यावे का?आमिर पठाण,आंदोलक.

Post a Comment

0 Comments