भिलवडी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या संस्था कार्यालयात वाहतूक नियम व विद्यार्थी सुरक्षेबाबत बैठकीच्या आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आजीव सदस्य व विभागप्रमुखांसाठी वाहतूक नियम व सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या.
सर्व विद्यार्थ्यांचा इन्शुरन्स (विद्यार्थी विमा)उतरणे,
भिलवडी, माळवाडी, धनगांव, भुवनेश्वरीवाडी व औदुंबरचे सर्व विद्यार्थींनी ये - जा करणेसाठी आडवाड्यातील रस्त्याचा वापर करावा असे नियोजन करणे.तसेच भिलवडी, माळवाडी मधील विद्यार्थ्यांनी शाळेत येताना सायकल घेऊन येऊ नये.
याशिवाय विभाग निहाय प्रवेशद्वाराजवळ (सकाळी ११.१५ ते १२ व सायंकाळी ०५ ते ०५.३० या वेळेत) प्रत्येकी एक शिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे तशा नोंदी ठेवणे असे ठरले.
शाळा सुटले नंतर रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून सायकल वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना १० मिनिटे उशिरा सोडणे आवश्यक असल्याचे .सांगितले
प्रवेशद्ववाराजवळ येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची नोंद यासाठी रजिस्टर ठेवावे व त्यामध्ये सर्व नोंदी आवश्यक आहेत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.व तश्या सुचना देणेत आल्या. यावेळी संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील, संभाजी सूर्यवंशी, सचिव मानसिंग हाके,सह सचिव के. डी.पाटील, सर्व विभागातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आजिव सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments